
लिंगायत समाजाच्या हक्कांसाठी एल्गार! १० ऑगस्टपासून बेमुदत साखळी उपोषण; तारदाळ ग्रामपंचायतीचा जाहीर पाठिंबा
महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळावा, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा; शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा लोकहिरा न्यूज तारदाळ प्रतिनिधी राजू टिळंगे लिंगायत समाजाच्या विविध प्रलंबित व न्याय्य मागण्यांसाठी १० ऑगस्टपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या बेमुदत साखळी उपोषणाला तारदाळ ग्रामपंचायतीने अधिकृत जाहीर पाठिंबा दिला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात लिंगायत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पूर्ण सहकार्य असल्याचे स्पष्ट























